सोने चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच ; वाचा आजचे नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५जानेवारी २०२३ । सोने चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडले आहे. दरम्यान, कालच्या घसरणीनंतर सोन्याची किमती 57 हजाराखाली आले होते. मात्र आज गुरुवारी सोने-चांदी पुन्हा महागली. त्यामुळे सोने पुन्हा 57 हजारांवर गेले आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी सोन्याची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे चांदी 0.30 टक्क्यांनी वाधरली आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा सोन्याचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सकाळी 24 कॅरेट सोन्याची किंमत किंचित 40 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,005 रुपायांवर व्यवहार करत आहे.

चांदीचा दरही घसरला?
आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. आज चांदीची किंमत 200 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे चांदी 68,745 रुपये प्रति किलोवर गेली आहे. लक्षात घ्या की गेल्या आठवड्यात चांदीने 70 हजार रुपयांची पातळीही ओलांडली होती, मात्र आता त्या पातळीवरून किंमतींत घसरण झाली आहे.

जळगावातील दर :
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,500 रुपयापर्यंत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,200 रुपायपर्यंत आहे. एक किलो चांदीचा भाव 68,200 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याच्या निर्यातीबाबत सरकार मोठा निर्णय घेणार
या दरम्यान, मौल्यवान सोन्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक, भारत सोन्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारी आणि सराफा बाजारातील सूत्रांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार पाऊल उचलू शकते, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.