सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम ; आज दरात झाला मोठा बदल

एप्रिल 26, 2023 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२३ । अनेक दिवसांपासून सुरू असलेला सोन्या-चांदीच्या दरातील चढ- उतार आजही कायम राहिला. कालच्या किमतीपेक्षा आज सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. सोबतच चांदी देखील वधारली आहे. दरम्यान, सोने आणि चांदी खरेदीसाठी शुभ मनाला जाणारा गुरुपुष्यामृत दिवस यंदा उद्या गुरुवारी आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,600 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी काल मंगळवारी सकाळी 60,400 (विनाजीएसटी) इतका होता. त्यात आतापर्यंत 200 रुपयाची दरवाढ झालेली दिसून आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्येही सोन्याचा दर खाली आला होता. मात्र त्यानंतर दरवाढीने आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढत नवे रेकॉर्ड केला आहे. मात्र आगामी दिवाळीपर्यंत सोने 63000 ते 65000 हजारापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दुसरीकडे चांदीच्या किमतीत बोलायचे झालं तर चांदीच्या दरात कालपेक्षा आज मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या चांदीचा एक किलोचा दर 75,200 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी तो काल मंगळवारी सकाळच्या सत्रात 74,800 रु (विनाजीएसटी) इतका होता. मात्र त्यात आतापर्यंत 400 रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे. आगामी दिवाळीपर्यंत चांदीचा दर 80000 हजारापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.

गुरुपुष्यामृत दिवस उद्या गुरुवारी आहे. या दिवशी सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, मालमत्ता खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र सध्या सोन्याच्या किमतीने गाठलेल्या नवीन रेकॉर्डने ग्राहकांना घाम फोडला आहे.

MCX वरील सोने-चांदीचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 97 रुपयाने वाढून 60,098 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी चांदी 111 रुपयांनी घसरून 74,885 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now