⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीचे भाव घसरले, पहा आजचे दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२३ । लोक देशात वेळोवेळी सोने आणि चांदीची खरेदी करत असतात. यासोबतच अनेक लोक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने-चांदीची खरेदीही करतात. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या दरात दररोज हालचाली होत आहेत. सध्या देशभरातील सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 60 हजारांवर गेला आहे. Gold Silver Rate Today

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत चढ उतार सुरूच आहे. आज मंगळवारी सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,400 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका आहे. दरम्यान, यापूर्वी बाजारात गेल्या आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा बाव 60,800 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. तर अक्षय तृतीयेच्या दिवशीसोनं 60,900 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका होता. मात्र त्यात मागील दोन तीन दिवसात घसरण झालेली दिसून येतेय.

दुसरीकडे चांदीच्या किमतीत बोलायचे झालं तर चांदीचा दरही आता घसरताना दिसून आहे. जळगाव सराफ बाजारात अक्षय तृतीयेच्या दिवशी 75,800 (विनाजीएसटी) रुपये प्रति किलो असलेला चांदीचा दर आता 74,800 रुपयावर आला आहे. म्हणजेच चांदीच्या सध्या दोन तीन दिवसात तब्बल 1000 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

MCX वरील सोने-चांदीचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 97 रुपयाने वाढून 60,098 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी चांदी 111 रुपयांनी घसरून 74,885 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.