जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतींनी मोठा दिलासा दिला. सोबतच चांदीची देखील दिलासा दिला. खरंतर गेल्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींनी डोंगर गाठला होता. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील ही घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली. या जानेवारी महिन्यात सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. Gold Silver Rate 25 January 2024
या महिन्याभरात 6 ते 7 दिवस सोने-चांदीचा भाव वधारला. प्रत्येक आठवड्यात सोन्यात घसरण झाली. तर काही दिवस सोन्याच्या किंमती वधारल्या. आताही सोन्याने घसरणीला ब्रेक लावला तर चांदीत नरमाईचे सत्र आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी, 19 जानेवारी 330 रुपयांनी तर 20 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली होती. तर या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या किमती बद्दल बोलायचं झाल्यास या महिन्याच्या सुरुवातीला चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मध्यंतरी चांदी 1400 रुपयांनी महागली. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. त्यानंतर भाव जैसे थे होते. 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,300 रुपये आहे.