Gold -Silver : आज सोने पुन्हा महागले, 10 ग्रॅमचा ‘हा’ आहे नवीन दर

फेब्रुवारी 24, 2023 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । चालू आठवड्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आठवड्याच्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने पुन्हा महागले आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित घसरण दिसून आलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत सोने ०.२८ टक्क्यांनी वाढले. तर चांदी ०.०९ टक्क्यांनी घसरली.

gold silver

MCX वरील आजचा दर?
MCX वर आज सकाळी १० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित १६० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सोने ५५,७४५ रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत ६० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ६४,२९२ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ५१,५०० ते ५१,६०० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ५६,३०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६६,४०० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now