Gold Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, मात्र चांदी स्वस्त ; तपास आजचा भाव

जून 23, 2022 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । जागतिक पातळीवर महागाईने कहर केला आहे. महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढीचे कठोर धोरण अवलंबले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. परिणामी सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव पुन्हा ५२ हजारावर गेला आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) भावात घसरण झाली आहे.

gold silver jpg webp

आज गुरुवारी १० ग्रॅम सोने १८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव सराफ बाजरात एका तोळ्याचा भाव ५२,१०० रुपये इतका आहे.तर दुसरीकडे आज चांदीच्या भावात १०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी ६२,०७० रुपये प्रति किलोवर आली आहे.
तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

गेल्या आठवड्यात सोने दोन वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे. त्यामुळे हालचालीमुळे सोने किंचित ५० रुपयापर्यंत महागले आहे. तर दुसरीकडे चांदी किंचित १०० रुपये ते १५० रुपयांनी महागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२० जून २०२२- रुपये ५२,०३० प्रति १० ग्रॅम
२१ जून २०२२ – रुपये ५१,९२० प्रति १० ग्रॅम
२२ जून २०२२ – रु ५१,९२० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२० जून २०२२- रुपये ६२,३७० प्रति किलो
२१ जून २०२२ – रुपये ६२, १७० प्रति किलो
२२ जून मे २०२२- रुपये ६२,०७० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now