जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । भारतात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून या निमित्त ग्राहकांचे पाय पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळत आहे. मात्र यातच आता सोने आणि चांदीचे पुन्हा वाढताना दिसत आहे. सोन्या आणि चांदीच्या महागल्या दरांनी ऐन हिवाळ्यात ग्राहकांना घाम फोडला आहे. जाणून घेऊया भारतातील सोने-चांदीचे आजचे दर…
सध्या भारतीय बाजारात सोन्याचे भाव सर्वोच्च पातळीपेक्षा खूपच स्वस्त झाले असून आगामी काळात दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे ग्राहकांनी हातात आलेली खरेदीची संधी सोडू नये.दरम्यान, रविवारी आणि सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सोमवारी सराफा बाजाराच्या महासंघाने सुट्टी जाहीर केल्याने भाव जाहीर झाले नाहीत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील भाव
आज मंगळवारी सोने आणि चांदीच्या वायदे दरांमध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वाढीसह व्यवहार होत आहे. सोन्याचे फेब्रुवारी वायदे (फ्युचर्स) MCX वर ७३ रुपये किंवा ०.१२ टक्क्यांची किरकोळ घट नोंदवून ६१,९४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले. ५ फेब्रुवारी रोजी डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याच्या फ्युचर्सचे मागील बंद ६१,८६८ रुपये होते. त्याचप्रमाणे दरम्यान, चांदीच्या मार्च फ्युचर्समध्ये ३४ रुपयांची किंवा ०.०५% घसरण झाली आणि MCX वर ७०,८१६ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७०,८५० रुपये प्रति किलोवर आले.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
दुसरीकडे, सध्या जळगावच्या सुवर्णनगरीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,५०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,१०० प्रति १० ग्रॅम दराने खरेदी-विक्रीस उपलब्ध आहे.