जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । जागतिक बाजारात प्रचंड उलथापालथ सुरु असून याचा परिणाम सोने-चांदीच्या (Gold Silver) किंमतींवर दिसून येतोय. भारतीय सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीची चढाई सुरु होती. पण दोन दिवसांपासून दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरु आहे. मागील काही दिवसापासून मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर 59 हजाराच्या वर असलेला भाव आता 58 हजाराच्या घरात आला आहे. दुसरीकडे चांदीत फारसा बदल दिसून येत नाहीय. आज सकाळी बाजाराच्या सुरुवातीलाच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या किमती वाढ झालेली दिसून येतेय. सोन्याचा दर स्थिर दिसून आला. Gold Silver Rate Today
MCX वर काय आहे दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव किंचित 5 रुपयांनी वाढून 58,824 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीची किंमत 0.15 टक्क्यांनी म्हणजेच 111 रुपयांनी वाढला आहे यामुळे चांदीचा एका किलोचा दर 73,179 रुपये झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 72,400 रुपयावर होता. त्यात पुन्हा वाढ झालेली दिसून येतंय.
जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,600 रुपये प्रति दहा ग्रॅम आह. 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,450 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव विनाजीएसटी 73,000 रुपये प्रति किलोवर विकला जात आहे.