सोमवार, डिसेंबर 4, 2023

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 24 तासात चांदी 2000 रुपयांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त..

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । सोने-चांदीने (Gold Silver Rate) मागील काही महिन्यात कहर केला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळीस असं वाटत होते की सोने आता लागलीच 70 हजारांच्या घरात पोहचतील. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घातल्याने सोन्यासह चांदीच्या किमतीत जोरदार घसरण झाली आहे. जळगावात गेल्या 24 तासात चांदीच्या किमतीत तब्बल 2000 रुपयांहून अधिकची घसरण झाली. सोनेही घसरली आहे.

काय आहे जळगाव सुवर्ण नगरीतील सोन्याचा दर? Gold Rate Today
जळगावात सध्या 22 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव 54,320 रुपये प्रति तोळा इतका आहे. हाच दर काल सकाळी 54,650 रुपयांनी विकला जात होता. त्याचबरोबर सध्या 24 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव 59,300 रुपये प्रति तोळा इतका होता. यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर 59,650 रुपयावर होता. म्हणजेच यात 350 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

जळगाव सुवर्ण नगरीतील चांदीचा दर? Silver Rate Today
दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी चढ उतार सुरूच आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 71000 रुपयावर आला आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 73300 रुपयावर होता. म्हणजेच त्यात आतापर्यंत तब्बल 2300 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 165 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,550 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. MCX वर काल सकाळी 10.30 वाजेपर्यंत चांदीचा दर 72,420 रुपये इतका होता. तो आता 68,650 रुपयावर व्यवहार करत आहे. म्हणजेच MCXवर गेल्या 24 चांदीच्या किमतीत तब्बल 3700 ते 3800 रुपयाची घसरण झाली आहे.