⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण ; जाणून घ्या प्रति ग्रॅमचा भाव..

सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण ; जाणून घ्या प्रति ग्रॅमचा भाव..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठलेले सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे.दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आज व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत नरमाईचा कल दिसून आला. बाजारात दोन्ही धातूंचे भाव लाल रंगात उघडले. Gold Silver Rate 19 December 2023

या काळात सोने १०० रुपयांनी तर चांदी ११० रुपयांनी स्वस्त झाली. यानंतर देशात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५७,००८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव ७४,२६० रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.

MCX वरील दर
जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याबद्दल बोललो, तर सोन्याची किंमत 0.35 टक्क्यांनी म्हणजेच 219 रुपयांच्या घसरणीसह 62,072 वर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदीची किंमत 0.15 टक्क्यांनी घसरून 113 रुपये 74,297 वर आली आहे.

जळगावात सोन्यात १२०० रुपयापर्यंत वाढ
दरम्यान, जळगावात गेल्या सुरुवातीला सोन्याचा दर विनाजीएसटी ६२,१०० रुपयांवर आले होता, चांदीचा दरही विनाजीएसटी ७२,३०० रुपयांवर होता. मात्र त्यांनतर १४ डिसेंबर रोजी दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ दिसून आली. आज विनाजीएसटी २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१५० रुपये इतका आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६२,४०० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर ७५००० रुपयावर आहे. दरम्याम मागील आठ दिवसात सोन्याच्या दरात १००० ते १२०० रुपयापर्यंतची वाढ दिसून येत आहे. तर चांदीच्या किमतीत तब्बल २८०० ते ३००० रुपयापर्यंतची वाढ दिसून येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.