जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । सोने आणि चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा तुमचा जर प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याची पडझड झाली असून डॉलरच्या तुलनेत सोने गेल्या पाच महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले. Gold Silver Rate Today
ऑगस्ट महिन्यातील दोन आठवड्यात सोन्याला सूर गवसला नाही. सोन्यात पडझड झाली. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या वाढीनंतर मे आणि जून मध्ये सोन्याचा दर घसरून 58 हजाराच्या घरात आला होता. तर चांदीचा दर देखील 70 हजाराखाली आला होता.
मात्र जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. सोन्याच्या (Gold Rate) भावाने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. तर चांदीने (Silver Rate) 77000 रुपयापर्यंतची मजल मारली होती. पण ऑगस्ट महिन्यात सोन्याला मोठी झेप घेता आली नाही.मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंचे दर घसरत असता दिसत आहे. सध्या सोन्याचा दर 59 हजाराखाली आला आहे. तर चांदीचा दर 70 हजाराखाली आल्याने ग्राहकांना खरेदीची संधी आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर काय आहे आजचा दर?
दरम्यान, भारतीय सराफा बाजार आजही लाल चिन्हाने उघडला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10 वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे)चा दर 196 रुपयांनी घसरून 58,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 135 रुपयांनी घसरून 69,587 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,000 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 70,000 रुपये इतका आहे.