आजचा सोने-चांदीचा भाव जाहीर ; पहा काय आहे प्रति ग्रॅमचा भाव?

एप्रिल 17, 2023 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत उंच्चाक व घसरण पाहायला मिळाली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अक्षय्य तृतीया येण्याआधीच सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव स्थिर दिसून आला मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित घसरण दिसून आली.

gold silver jpg webp

जळगाव सुवर्ण नगरीत आज सकाळी सोन्याचा दर जाहीर करण्यात आला. त्यानुसार आज सोन्याचा दर स्थिर दिसून आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 (विना जीएसटी) इतका आहे. मात्र गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांने महागले.

आज एक किलो चांदीचा भाव 75,८00 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तो काल ७५, ९०० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात १०० रुपयाची घसरण दिसून येतेय. दोन दिवसापूर्वी शनिवारी त्यात 1600 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली. गेल्या आठवड्यात चांदी 1300 रुपयांने महागली आहे.

हॉलमार्कचे सोनं कसे खरेदी कराल?
सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now