⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘या’ आठवड्यात सोने-चांदीचा भाव ‘एवढ्या’ रुपयांनी वाढला ; काय आहे आजचा नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मौल्यवान धातूंच्या किमती प्रचंड महागल्या आहे. याचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर दिसून आला आहे. या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय.

मागील काही दिवसात सोने-चांदी(Gold Silver Price) नव-नवीन रेकॉर्ड नावावर करत आहे. त्यातच अक्षय्य तृतीया सारखा मोठा सण काही दिवसावर आला असून यावेळी या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र सोन्याच्या किमतीने ग्राहकांना घाम आणला आहे.

काय आहे जळगावात सोन्याचा भाव?
आज रविवारी सुट्टी आल्यामुळे सोन्याचा दर जाहीर केला जात नाही. त्यामुळे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,800 (विना जीएसटी) इतका आहे. मात्र या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदविली गेलीय.

या आठवड्यातील सोन्याचे असे होते दर?
सोमवारी (10 एप्रिल) सोन्याचा दर विना जीएसटी 60,200 रुपये इतका होता. मंगळवारी त्यात 300 रुपयाची वाढ होऊन तो 60,500 रुपायांवर गेला. मात्र, बुधवारी सोन्याच्या किमतीत 400 रुपयाची घसरण होऊन प्रति तोळा 61,100 आला होता. गुरुवारी 61,100 होता. शुक्रवारी पुन्हा 400 रुपयांची वाढ होऊन सोने 61,500 रुपयांवर गेले. काल शनिवारी 60,800 रुपये प्रति तोळा इतका होता. या गेल्या 6 दिवसात सोने 600 रुपयांने महागले.

आजचा चांदीचा दर | Silver Rate Today
या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली. सध्या आज एक किलो चांदीचा भाव 75,900 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. शनिवारी त्यात 1600 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र या आठवड्यात चांदी महागली.

या आठवड्यातील चांदीचे असे होते दर?
सोमवारी (10 एप्रिल) विना जीएसटी एक किलो चांदीचा दर 74,600, मंगळवारी 74,800 रुपये, बुधवारी 76000, गुरुवारी 76,500, शुक्रवारी 77,500 रुपये आणि शनिवारी 75,900 रुपये इतका आहे. मात्र येत्या काही दिवसात सोने 80000 रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे. या गेल्या 6 दिवसात चांदी 1300 रुपयांने महागले.

हे आहे सोन्याच्या दरवाढीचे कारण?
अमेरिकन फेडरल बँकेने आपल्या व्याजविषयक धोरणात जे काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहता गुंतवणूक दाराना बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे हे सोईचे आणि सुरक्षित वाटत आहे. अनेकांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे आपला कल वाढवल्याने जागतिक पातळीवर सोन्याच्या  मागणीत मोठी वाढ झाली आहे.