चांदीने मोडले आतापर्यंत सगळे रेकॉर्ड! एका दिवसात 1000 रुपयाची वाढ, सोनेही..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । एकीकडे जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढत असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या किमती सुरु असलेली दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली असून चांदीच्या किमतीने तर नवीन रेकॉर्ड केला आहे. चांदीच्या किमतीने 77 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. Gold Silver Rate Today

आजचा सोन्याचा दर | Gold Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत काल सकाळच्या सत्रात स्थिर असलेला सोन्याचा भावात आज वाढ दिसून आलीय. आज शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. काल सकाळी 61,100 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात 400 रुपयाची वाढ झाली आहे.

सोने 5 हजार रुपयाहून अधिकने वाढले
दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 56 हजाराच्या (विना जीएसटी) आत होता. मात्र त्यात गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. एकंदरीत जवळपास दीड महिन्यात सोन्याच्या भावात तब्बल 5 हजार रुपयाहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय. दिवाळीपर्यंत सोने 65 हजार रुपयावर जाण्याची शक्यता आहे.

आजचा चांदीचा दर | Silver Rate Today
जळगाव सुवर्ण नगरीत आज सकाळच्या सत्रात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे. आज सकाळी एक किलो चांदीचा भाव 77,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 76,500 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात तब्बल 1000 रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, गेल्या दीड महिन्यापूर्वी चांदीचा दर 64 हजार रुपयाच्या घरात होता. तो आता 76 हजारावर गेला आहे. म्हणजेच दीड महिन्यापूर्वी चांदी 16000 हजार रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत चांदी 80 हजाराचा टप्पा ओलांडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.