---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

अक्षय तृतीयापूर्वीच सोने-चांदीने घेतली मोठी उसळी ; किमतींनी गाठला नवा रेकॉर्ड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । सोन्या (Gold Rate) आणि चांदी (Silver Rate) खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक झटका देणारी बातमी आहे. गेल्या दोन दिवसापासून 61 हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भावाने आज सकाळी 61 हजाराचा टप्पा पार केला आहे. सोबतच चांदीने नवीन रेकॉर्ड केला आहे. चांदीचा दर 76 हजारावर गेला आहे. Gold Silver Rate Today

gold silver rate jpg webp

काय आहे आजचा सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत आज बुधवारी सकाळी 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,100 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याच्या बुधवारीच सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. त्या दिवशी सोने 61 हजारावर जाऊन नवीन रेकॉर्ड केला होता.

---Advertisement---

दरम्यान, सोमवारी (10एप्रिल) सकाळी 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,200 रुपये, मंगळवारी 60,500 रुपये आणि आज 61,100 रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसात जळगावात सोन्याच्या किमतीत तब्बल 900 रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, काही दिवसावर अक्षय तृतीय सारखा सण येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 22 एप्रिल रोजी आहे. यादिवशी या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना घाम आला आहे. पुढील आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

आजचा चांदीचा दर काय?
दुसरीकडे चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. आज बुधवारी सकाळी चांदीचा एक किलोचा भाव 76,000 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी चांदीचा दर 74,600 रुपये इतका होता. तर काल मंगळवारी सकाळी 74,800 रुपये इतका होता. म्हणजेच गेल्या दिवसात चांदीचा भाव तब्बल 1600 रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, चांदीच्या दरात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात चांदी 78 हजार रुपयांवर जाऊ शकते.

हॉलमार्कचा संबंध
24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---