जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२३ । इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) किमती वाढू लागल्या आहेत. आगामी काळात दोन्ही धातूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही दिसून येत आहे. दरम्यान, आज बुधवारीही सराफा बाजार हिरव्या चिन्हाने उघडला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. Gold Silver Rate Today
काय आहे आजचा दर?
आज सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे 50 रुपयांनी तर चांदीच्या दरात 120 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 52,928 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. तर 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 57,740 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तर चांदीचा भाव वाढल्यानंतर तो 69,110 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरील आजचा दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांनी म्हणजेच 36 रुपयांच्या वाढीसह 57,665 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदीची किंमत 0.15 टक्क्यांनी म्हणजेच 102 रुपयांनी वाढत आहे आणि ती 69,020 रुपये प्रति किलो आहे.
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची (22 कॅरेट) किंमत 53,700 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकली जात आहे. तर येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 70,000 रुपये प्रति किलो आहे.
दरम्यानं आगामी दिवसात दसरा-दिवाळी सारखा सण येऊन ठेपला आहे. याकाळात देशात बरेच लोक दागिने खरेदी करतात. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरु होती. यामुळे दोन्ही धातूंचे दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर आले होते. मात्र आता इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदी पुन्हा महाग होऊ लागली. आगामी काही दिवसात सोन्याचा दर 60 हजारांवर तर चांदीचा दर 75 हजार रुपयावर जाण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.