खुशखबर..! चांदी 700 रुपयांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त ; वाचा आताचा नवीन भाव?

फेब्रुवारी 10, 2023 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२३ । मागील काही ट्रेडिंग सत्रात सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. दरम्यान, आज तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मागील दिवसापासून 57 हजारावर असलेला सोन्याचा भाव 56 हजारांवर आला आहे. आज आठवड्याचा शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आलीय. सोबतच चांदीच्या किमतीत देखील घसरण झालीय.

gold silver rate jpg webp

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 पर्यंत सोन्याच्या किमतीत 0.57 टक्क्यांनी घसरण झालीय. तर चांदी 1.10 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

काय आहे आजचा भाव?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 पर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 322 रुपायांची घसरण झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 56,530 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याचा दर 57,200 रुपये प्रति तोळा इतका होता.

आज दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय. आज चांदी 700 रुपयांनी घसरली असून यामुळे चांदी 66,326 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात चांदी 67,500 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.

जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत सोने आणि चांदीचा दर स्थिर आहे. आज 22 कॅरेट सोने 52,700 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर 69000 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तर तपासाच पण त्यासंबंधित कोणतीही तक्रार तुम्ही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now