सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात झाली घसरण ; वाचा आजचे दर

नोव्हेंबर 17, 2021 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत होती. मात्र, ऐन लग्नसराईच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीच्या बेतात असलेल्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मंगळवारनंतर बुधवारीही सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले. जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोन्याचे दर २६० रुपयांनी तर चांदीचे दर ३३० रुपयांनी कमी झाले.

gold silver (3)

सणासुदीत मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होऊन सोन्याने ५० हजाराचा तर चांदीने ६५ हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्यातच लग्नसराईला सुरुवात होणार असल्याने सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीचे दर काहीसे कमी झाले आहेत. मंगळवार दि.१६ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे २० रुपयांनी तर चांदीचे दर प्रति किलोमागे ६०० रुपयांनी कमी झाले होते. बुधवारी देखील सोने-चांदीचे दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी २६० रुपयांनी तर चांदीचे दर प्रति किलोसाठी ३३० रुपयांनी कमी झाले.

दोन दिवसात इतकी झाली घसरण
दोन दिवसात सोन्याचे दर २८० रुपयांनी तर चांदीचे दर ९३० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी ५०,४७० रुपयांवर असलेले सोन्याचे दर ५०,१९० रुपयांवर तर ६८,७२० रुपयांवर असलेचे चांदीचे दर ६७,७९० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणाऱ्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now