सोन्याच्या किमतीने आज सगळे जुने रेकॉर्ड तोडले; ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ

ऑक्टोबर 8, 2025 12:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । सोन्याच्या किमती पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोने दरात तब्बल १५०० रुपयाची वाढ झाली. या दरवाढीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख २३ हजारांच्या पार गेले असून यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

GS8 Octo

दिवाळी या झगमगणाऱ्या आनंदाच्या सणाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. १८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरूवात होईल. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण सोने-चांदी खरेदी करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज काय आहेत भाव?

आज ८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १५०० रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२३,१७० रूपये मोजावे लागतील. दुसरीकडे आज चांदी दरात कोणताही बदल दिसून आला नाहीय. सध्या चांदीचा एक किलोचा दर १,५७,००० रुपये इतका आहे.

जर सोन्याच्या भावात ही वाढ अशीच राहिली तर भारतात दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव १.४५ लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now