जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२६ । सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू असून आज गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कालच्या वाढीनंतर आजही सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या चिंतेत भर पडली आहे. प्रति तोळ्यामागे तब्बल ३३० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, चांदीच्या दरात मोठी झेप पाहायला मिळाली असून प्रति किलोमागे तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच वाढलेल्या या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज गुरुवारी सकाळी सराफ बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी वाढून १,५२,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २६४ रुपयांनी वाढून १,२१,९६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३,३०० रुपयांनी महागले असून हे दर १५,२४,६०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,३९,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २४० रुपयांनी महागलं असून हे दर १,११,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३००० रुपयांनी महागलं असून हे दर १३,९७,५०० रुपये झाले आहेत.
आज १८ कॅरेटमागे सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,३४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९१,४७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,४३,४०० रुपये झाले आहेत.
चांदीचे दर वाढले
सोन्यानंतर चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. १ किलोमागे चांदी जवळपास ५००० रुपयांनी महागली आहे. हे दर २,७०,००० रुपये झाले आहेत.












