सोने, चांदी दरातील घसरणीला ब्रेक ; जळगावमधील आताचे दर काय?घ्या जाणून..

मार्च 7, 2026 2:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या सोने, चांदी दरातील घसरणीला ब्रेक लागला असून आज शनिवारी सकाळी अचानक वाढ झाली. या वाढीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी थोडी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून आले.

gold

काय आहेत सोन्याचे दर ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शनिवारी सकाळी सोने दरात २१६३ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६६ हजार १३९ रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी गुरुवारी १७५१ रुपयांची तर शुक्रवारी २०६० रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ९७६ रुपयांपर्यंत खाली आले होते.

चांदीचे दर काय?

दुसरीकडे चांदी दरात प्रति किलो तब्बल ४१२० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी गुरुवारी १० हजार ३०० रुपयांची तर शुक्रवारी १०३० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७३ हजार ९८० रुपयांपर्यंत खाली आले होते.

सोने-चांदीतील दरवाढीचे कारण काय?

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेवर स्पष्टपणे जाणवत असताना, विशेषतः पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या किमतींनाही काही प्रमाणात आधार मिळाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

आगामी काळात सोन्याच्या किमतींची दिशा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असेल. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता कायम राहिली, तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now