अरे देवा! सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले, चांदीतही मोठी वाढ; आताचा एक तोळ्याचा भाव काय?

ऑगस्ट 6, 2025 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । एकीकडे सणासुदीचे दिवस चालू झाले असून यातच रक्षाबंधन सारखा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादिवशी अनेक जण सोने-चांदी खरेदी करतात. मात्र रक्षाबंधनापूर्वीच सोने आणि चांदी दरात प्रचंड वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली, सोबतच चांदीचा दर देखील वाढला आहे. यामुळे खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसणार आहे.

gold silver jpg webp

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ११० रुपयांनी महागले असून ते खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०२,३३० रुपये मोजावे लागणार आहे. तर जीएसटीसह १ लाख ५ हजारांवरच खर्च खरावा लागेल.

तसेच आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली असून हे खरेदीसाठी तुम्हाला ९३,८०० रुपये मोजावे लागणार आहे. काल याच सोन्याचे दर ९३,७०० रुपये इतके होते. तसंच, आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ७६,७५० रुपये मोजावे लागणार आहेत. हेच सोनं मंगळवारी ७६,६७० रुपयांना विकले गेले.

दुसरीकडे आज केवळ सोनेच नाही तर चांदीच्या किमतीतही मोठी वाढ दिसून आली आहे. आज १ किलो चांदीचे दर १००० रुपयांनी महागले असून ते खरेदीसाठी तुम्हाला १,१६,००० रुपये द्यावे लागतील.

दरवाढीचे कारण काय?

अमेरिकेतील व्याजदरांमध्ये संभाव्य कपात आणि कमकुवत नोकरीच्या आकडेवारीमुळे, गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारतावर आणलेल्या दबावामुळे, रुपया घसरला आहे, जो आता प्रति डॉलर ८८ रुपयांवर पोहोचला आहे. कमकुवत रुपयामुळे, आयात महाग झाली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now