ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; उच्चांकानंतर सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त..

मार्च 5, 2026 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । इराण-इस्रायल आणि अमेरिकासह मध्य पूर्व देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर दिसून आला होता. सोन्याच्या किमती ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र मागच्या दोन-तीन दिवसात सोने दरात घसरण झाली. सोबतच चांदी दरातही मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

gold silver 2 jpg webp

जळगाव शहरातील सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या भावात ३ व ४ मार्च रोजी मोठी घसरण झाली. चांदीचे भाव ३ रोजी १३ हजार व ४ रोजी १० हजार असे दोन दिवसांत एकूण २३ हजार रुपयांनी कमी होऊन दोन लाख ७५ हजार रुपयांवर आले. सोन्याच्या भावात ३ रोजी तीन हजार ५०० रुपये व ४ रोजी २ हजार ६०० अशी एकूण ६ हजार १०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख ६२ हजार ४०० रुपयांवर आले.

२६ फेब्रुवारी रोजी चांदीमध्ये १० हजारांची घसरण झाल्यानंतर २७फेब्रुवारीपासून चार दिवस भाववाढ होत गेली. त्यामुळे २ मार्चपर्यंत चांदी २ लाख ९८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, ३ रोजी एकाच दिवसात १३ हजार रुपयांची घसरण होऊन चांदी दोन लाख ८५ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. ४ मार्च रोजी १० हजार रुपयांनी भाव कमी झाले व चांदी दोन लाख ७५ हजार रुपये किलोवर आली.

सोन्याच्या भावात २ रोजी २ हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख ६८ हजार ५०० रुपयांवर आले होते. त्यात ३ मार्च रोजी पुन्हा तीन हजार ५०० रुपयांची व ४ रोजी २ हजार ६०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ६२ हजार ४०० रुपये तोळ्यावर आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now