जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२५ । दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. मात्र, धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या दरात घट झाली. आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून यामुळे सोन्याचा दर कुठंवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. अशातच आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीने सुखद धक्का दिला आहे. आज ४ नोव्हेंबर रोजी सोने दरात ७१० रूपयांची घसरण झाली आहे. सोबतच चांदीच्या भावात ३ हजार रूपयांची घसरण झाली आहे.यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

आज काय आहे भाव?
आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७१० रूपयांची घसरण झाली आहे. यानंतर आता १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२२,४६० रूपये मोजावे लागतील. तर २२ कॅरेट सोने दरात ६५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१२,२५० रूपये मोजावे लागतील. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५४० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,१८,४०० रूपये मोजावे लागतील.

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. १ किलो चांदीच्या भावात ३ हजार रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५१,००० रूपये मोजावे लागतील.









