ग्राहकांना दिलासा ! अमेरिका–इराण तणाव ओसरल्यानंतर जळगावात सोने-चांदीचा दर घसरला

मार्च 4, 2026 6:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२६ । मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये अशांतता निर्माण झाल्याने जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोने आणि चांदी दरात मोठी दरवाढ दिसून आली होती. मात्र अमेरिका–इराण देशांमधील तणावाचा परिणाम ओसरल्यानंतर आता दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण फायदेशीर ठरू शकते.

gold silver 1 jpg webp

काय आहे सोन्याचा दर
जळगाव सराफ बाजारात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी २३६९ रुपयांची घट झाल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७३ हजार ५५५ रुपयांवर होते. मंगळवारी आणखी ३६०५ रुपयांनी घट होऊन दर एक लाख ६९ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली आले. तर आज बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी २९८७ रुपयांची घट नोंदवली गेली आणि सोन्याचे दर एक लाख ६६ हजार ९६३ रुपयांवर घसरले.

चांदीचा दर
चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोमवारी ३०९० रुपयांनी वाढ झाल्यानंतर दर प्रति किलो तीन लाख सहा हजार ९४० रुपयांवर होते. परंतु मंगळवारी १३ हजार ३९० रुपयांनी घट झाली आणि बुधवारी आणखी १२ हजार ३६० रुपयांची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो २ लाख ८१ हजार १९० रुपयांवर आले.

सुवर्ण–चांदीच्या या घटीत ग्राहकांना दागिने खरेदीसाठी आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्यांसाठी हा घसरणीचा काळ फायदेशीर ठरू शकतो. व्यावसायिकांनीही उलाढाल सुरळीत असल्याचे नमूद केले आहे, ज्यामुळे बाजारपेठेत स्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now