अरे देवा! ऐन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने दरात मोठी वाढ, नवीन किंमती काय?

ऑक्टोबर 21, 2025 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा लक्ष्मीपूजनाचा आज मुहूर्त आहे. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र दिवाळी तोंडावर सराफा बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीने विक्रमी पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या आदल्या सोमवारी दिवशी सोन्यात किंचित घसरण झाली होती. तर चांदी दरात तब्बल ७००० हजाराची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला, परंतु आज लक्ष्मी पूजनला सोन्याने महागाईचे दर्शन दिले. आज सोने दरात मोठी वाढ झाल्याने नवीन किंमती पाहून ग्राहकांना घाम फुटला आहे.

gold silver

या वर्षात मौल्यवान धातुत मोठी वाढ झाली आहे. धनत्रयोदशीपर्यंत दोन्ही धातुत मोठी पडझड झाली होती. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशीकिंमतींत घसरण होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल असा अंदाज होता. मात्र हा अंदाज खोटा ठरवला. goodreturns नुसार आज मंगळवारी १ तोळा सोन्याचे दर २०२८० रुपयांनी महागले आहे. ज्यामुळे आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदीसाठी तुम्हाला १,३२,७७० रुपये मोजावे लागणार आहे. त्याच बरोबर २२ कॅरेट सोने देखील आज १९०० रुपयांनी वाढून ते १,२१,७०० रुपयांवर पोहोचले आहे.

दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदी दरात २००० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे आज एक किलो चांदीचा दर १,७०,००० रुपयावर पोहोचला आहे. चांदीत घसरण झाली असली तरी सध्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत.

गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 60 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे यंदाची दिवाळी ही ग्राहकांची बजेट बिघडवणारी दिवाळी असल्याचे पाहायला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now