ग्राहकांना दिलासा ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर घसरला, नवीन दर काय?

मे 18, 2026 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे (१० ग्रॅम) थेट ७१० रुपयांनी घसरले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याने उच्चांकी पातळी गाठल्यामुळे लग्नसराई आणि इतर कारणांसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.मात्र, आज झालेल्या या लक्षणीय घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५६,२२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६८ रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,१०० रुपयांनी घसरले असून हे दर १५,६२,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामगे ६५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४३,२०० रुपये झाले आहेतय ८ ग्रॅममागे सोनं ५२० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,१४,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी घसरले असून हे दर १४,३२,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५३० रुपयांनी घसरले असून हे दर १,१७,१७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४२४ रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९३,७३६ रुपये झाले आहेत. १- तोळ्यामागे ५,३०० रुपयांनी घसरण झाली असून हे दर ११,७१,७०० रुपये झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now