अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशीच दरवाढीचा भडका; चांदी 10,000 महागली, तर सोने..

एप्रिल 18, 2026 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२६ । उद्या, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. भारतीय संस्कृतीत या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. काल शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशीच सोने – चांदी दरात मोठी वाढ झाली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे उद्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचे की नाही, असा पेच ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. Gold silver Rate Today

gold

काय आहे आता सोन्याचे दर?

आज सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता एक तोळा सोन्याचा दर १,५५,७८० रुपयावर पोहोचले आहे. तर ८ ग्रॅममागे ६४८ रुपयांची वाढ होऊन हे दर १,२४,६२४ रुपये झाले आहेत. तर आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी वाढून १,४२,८०० रुपयावर पोहोचले आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचे दर ६१० रुपयांनी वाढून १,१६,८४० रुपये झाले आहेत.

चांदी दरात मोठी उसळी

सोन्यापेक्षाही अधिक धक्कादायक वाढ चांदीच्या दरात पाहायला मिळाली. शनिवारी सकाळी चांदीचा दर एकाच झटक्यात तब्बल १०,००० रुपयांनी वाढला. या वाढीमुळे आता एक किलो चांदीचा दर २,७५,००० रुपयांवर (पावणे तीन लाख) पोहोचला आहे.

खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

उद्या, १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया असल्याने सराफ बाजार गजबजण्याची शक्यता होती. मात्र, एकाच दिवसात झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता या वाढलेल्या दरातही अक्षय्य तृतीयेचा उत्साह कायम राहतो की ग्राहक पाठ फिरवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now