जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२५ । आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. उद्या १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असून या दिवशी अनेक जण सोने-चांदी खरेदी करतात. मात्र धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतली असून यामुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

दिवाळीमध्ये सोन्याचे दर कमी होईल अशी आशा ग्राहकांना होती. पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली झाल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३,३३० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोनं खरेदीसाठी १,३२,७७० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२१,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तर १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात २,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९९,५८० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दुसरीकडे चांदी दरात आज प्रति किलो ४००० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर १८५००० रुपयावर पोहोचला आहे.










