जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२६ । लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोबत आज चांदी दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Gold Silver Rate Today

काय आहे सोन्याचा भाव?
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बाजार उघडल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा २,६२० रुपयांनी स्वस्त झाला. यानंतर आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,५५,७८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारी १ तोळा सोनं १,५८,४०० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,४०० रुपयांनी घसरण होऊन १,४२,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

चांदीचा भाव :
दरम्यान, सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ किलो चांदी तब्बल १५,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,८०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.
सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २९ जानेवारी रोजी सोन्या-चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यापासून त्यात लक्षणीय घट झाली आहे. सोन्याचे दर अंदाज ३५ ते ३८ हजारापर्यत कमी झाल्या आहेत, तर चांदीच्या किमती १.२० लाखांहुन अधिकने घटल्या आहेत.












