जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२५ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरु आहे. मागच्या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा तोळा महागला आहे. आज सोमवारी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढले आहे.

दिवाळीपूर्वी सोने-चांदीने विक्रमी दर गाठला होता. मात्र सणासुदीचा काळ संपताच सोने-चांदीने महागाईची वाट सोडून पुन्हा स्वस्ताईच्या दिशेने वाटचाल सुरु केली. गेल्या आठ्वड्यात सोने दरात घसरण दिसून आली. परंतु आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून अशातच आता सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

काय आहे आजचा सोन्याचा दर
आज सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. १ तोळ्यामागे सोन्यासाठी १,२३,००० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९६० रुपयांनी वाढले असून ते ९८,५७६ रुपये झाले आहेत.
२२ & १८ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर सध्या १,१२,९५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्यामागे ८८० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९०,३६० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोबतच आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ९२,४२० आहेत. ८ ग्रॅममागे ७२० रुपयांची वाढ झाली असून हे दर ७३,९३६ झाले आहेत.
चांदीचा दरही वाढला
आज सोमवारी सोण्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी वाढ झाली. आज चांदीचा दरात २५०० रुपयाची वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर १,५५,००० रुपयांवर पोहोचला.









