नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठा बदल; खरेदीपूर्वी वाचा नवीन दर

नोव्हेंबर 1, 2025 1:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२५ । गत ऑक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी दरवाढ दिसून आलीय. मात्र दिवाळीच्या मुहूर्तापासून दोन्ही धातूंमध्ये अचानक घसरण झाली. तरी पण सोन्या चांदीचे दर लाखांच्या वर आहेत. आता नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचे मूहूर्त सुरु होणार आहे. लग्नसमारंभात दागिने बनवले जात असल्यामुळे सोन्याचे दर कमी व्हावेत, असं सर्वांना वाटत होते. अशातच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

gold silver jpg webp

आज सोन्याचे दर घसरले आहे. सोने दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आधी दर जाणून घ्या.

सोन्याचे आजचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २८० रुपयांनी घसरले आहेत. आज सोन्याच्या किंमती १,२३,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९८,४०० रुपये आहेत. हे दर २२४ रुपयांनी कमी झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,१२,७५० रुपये आहेत. हे दर २५० रुपयांनी घसरले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरले असून सध्या ९०,२०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९२,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६८ रुपयांनी घसरले असून ते सध्या ७३,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २१०० रपयांनी घसरले असून ते ९,२२,५०० झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now