आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, चांदीत मोठी वाढ ; नवीन दर वाचा

डिसेंबर 9, 2025 12:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । सोने दरात चढ उतार सुरूच असून आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. दुसरीकडे मात्र चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायचा तुम्ही प्लान करत असाल तर आजचे नवीन दर काय आहेत ते घ्या जाणून ..

gold

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट होऊन ते १,३०,०९० रुपयावर पोहोचला.तर आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,२५० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोन्याच्या दरात आज घसरण झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल १,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now