सोने-चांदीने ग्राहकांना दिला पुन्हा झटका! किमतीत झाली मोठी वाढ

जुलै 8, 2024 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । सोने आणि चांदीने ग्राहकांना पुन्हा झटका दिला आहे. गेल्या आठवड्यात सोने चांदीने दरवाढीने जून महिन्यातील सर्व कसरच जुलैच्या पहिल्या सत्रात भरुन काढली. जून महिन्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता सोने-चांदीने दणका दिला.

8july goldsilver jpg webp

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत जुलै महिन्याच्या शनिवारी संपलेल्या पहिल्या आठवड्यात सोने प्रति तोळा १३५० रुपयांनी तर चांदी २ हजार रुपयांनी महागली आहे. यामुळे लग्नसराईला दागिने खरेदी करणाऱ्यांना झटका बसला आहे.

जळगावात २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम दर विनाजीएसटी ६७,४१८ रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम दर विनाजीएसटी ७३,६०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ९१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दिवाळीत सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत जाणकारांनी दिले आहे. त्यानुसार दोन्हींमध्ये दरवाढीला सुरुवात झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now