आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीची झळाळी वाढली ; आता भाव किती?

मार्च 31, 2026 2:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२६ । आज, ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असताना सोन्याची झळाळी वाढली आहे. सोबतच चांदी दरातही वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत आज सकाळी सोन्यासह चांदी दरात वाढ नोंदवली गेली.

gold silver rate jpg webp

goodreturns वेबसाईटच्या माहितीनुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १०३० रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोन्याचा दर १,४९,२९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. ८ ग्रॅमचा भाव ८२४ रुपयांनी वाढून १,१९,४३२ रुपये इतका आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर ९५० रुपयांनी वाढून १,३६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर १८ कॅरेटचा भाव ७८० रुपयांनी वाढून १,११,७९० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.

दुसरीकडे सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आलीय. आज चांदीच दर ५००० रुपये प्रति किलोने वाढला आहे. यानंतर चांदीचा एक किलोचा दर २,५०,००० रुपयावर पोहोचला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now