---Advertisement---
बातम्या वाणिज्य

आज सोन्यासह चांदीचा भाव वाढला; आता 10 ग्रॅमचा भाव तपासा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । देशभरात लग्नराईचे दिवस सुरु आहे. यादरम्यान सोने आणि चांदीला मागणी असते. यातच सोने आणि चांदी दरात चढ उताराचे सत्र कायम असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ दिसून आलीय.

gold jpg webp webp

मल्टी कमोडिटी एक्सेंजवर सोन्याच्या दरात 136 रुपयांची तेजी होती. 10 ग्रॅम सोन्याचे 76680 रुपयांवर व्यवहार सुरु होते. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर 76544 रुपये होते. आज, सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 186 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीचा दर 89073 रुपये होता. शुक्रवारी हा दर 88887 रुपयांवर होता.

---Advertisement---

सराफ बाजारात दागिने विक्रेत्यांकडून होणारे लिलाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचे दर 79200 रुपये इतके होते रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध, पश्चिम आशियातील संघर्षाची स्थिती, जागतिक तणावर या कारणांमुळं लोकांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधला जात आहे. गेल्या सत्रात 10 ग्रॅम सोन्याचे दर 78850 रुपये होते.

चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर 91700 रुपये किलो होते. या आठवड्यात चांदीच्या दरात 3550 रुपयांची वाढ झाली आहे. 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 350 रुपयांनी वाढून 78800 रुपयांवर पोहोचला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---