⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त ; ‘हा’ आहे प्रति तोळ्याचा भाव??

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहे. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरातही थोडीशी घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today

आज, गुरूवार, 29 डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारच्या सत्रात सोन्याच्या किमतीत किंचित 60 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,700 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 104 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र, घसरण होऊनही चांदीचा भाव 69,000 रुपयांच्या नजीक आहे.आज दुपारी चांदीचा प्रति किलोचा दर 68,909 रुपयावर व्यवहार करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव घसरले
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.24 टक्क्यांनी घसरून $1,807.97 प्रति औंस झाला. त्याचवेळी, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भावही लाल निशाण्याने व्यवहार करत आहे. आज चांदीचा दर 1.73 टक्क्यांनी घसरून 23.62 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.