सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच ; जळगावमध्ये आताचे नवीन काय?

नोव्हेंबर 25, 2025 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२५ । सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून या आठवड्याची सुरुवात दोन्ही धातूंच्या दरातील घसरणीने झाली. सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ते एक लाख २३ हजार रुपयांवर आले. तसेच चांदीच्या भावात १५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५५ हजार रुपयांवर आली.

gold

गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २४ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर २१ रोजी १७०० रुपयांची घसरण झाली व २२ रोजी पुन्हा तेवढीच भाववाढ झाली. २३ रोजी एक लाख २४ हजार रुपयांवर स्थिर राहिल्यानंतर २४ रोजी त्यात एक हजार रुपयांची घसरण झाली व सोने एक लाख २३ हजार रुपये प्रती तोळ्यावर आले.

दुसरीकडे २१ नोव्हेंबर रोजी चांदीच्या भावात ४७०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५३ हजार ३०० रुपयांवर आली. २२ रोजी त्यात ३२०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली व २३ रोजी याच भावावर स्थिर राहिली. २४ नोव्हेंबर रोजी १५०० रुपयांची घसरण होऊन चांदी एक लाख ५५ हजार रुपये प्रती किलोवर आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now