⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक, आज झाली मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २५जानेवारी २०२३ । ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. काल मंगळवारी सोन्याच्या किमतीने नवा विक्रमी उच्चांक गाठला. दरम्यान, आज सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसून येतेय. सोबतच चांदीही घसरली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 0.27 टक्क्यांनी घसरले आहे. तर दुसरीकडे चांदी 0.41 टक्क्यांनी घसरली आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा सोन्याचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सकाळी 11 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याची किंमत 155 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,817 रुपायांवर व्यवहार करत आहे.

चांदीचा दरही घसरला?
आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदीची किंमत 280 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे चांदी 68,265 रुपये प्रति किलोवर गेली आहे. लक्षात घ्या की गेल्या आठवड्यात चांदीने 70 हजार रुपयांची पातळीही ओलांडली होती, मात्र आता त्या पातळीवरून किंमतींत घसरण झाली आहे.

जळगावातील दर :
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,800 रुपयापर्यंत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,500 रुपायपर्यंत आहे. एक किलो चांदीचा भाव 68,200 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याच्या निर्यातीबाबत सरकार मोठा निर्णय घेणार
या दरम्यान, मौल्यवान सोन्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक, भारत सोन्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारी आणि सराफा बाजारातील सूत्रांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार पाऊल उचलू शकते, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.