गुरूवार, जून 8, 2023

Gold-Silver Rate: सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । मे महिन्याचा तिसरा आठवडा सोन्या-चांदीच्या दरात स्थिरतेसह सुरू झाला आहे. तुम्हाला लग्नाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

MCX वर आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याचा दर १८४ रुपयांनी घसरून ६०,१९५ रुपयावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीच्या किमतीत ६३० रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलोचा दर ७२,६९१ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झालेली आहे. ६० हजाराच्या घरात आलेला सोन्याचा पुन्हा ६१ हजाराच्या घरात गेला आहे. शुक्रवारी सकाळी ६०,८०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा असलेला सोन्याचा दर शनिवारी वाढून 61,600 (विनाजीएसटी) रुपायांवर गेला. सोबतच चांदीचादर देखील वाढून ७३,७५० रुपयावर गेला आहे