⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सोने दराने गाठली एक वर्षांतील उच्चांकी पातळी, जाणून घ्या आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । मागील गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडीमुळे गुंतवणुकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून आलं होतं. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने (Gold) गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. जळगाव सराफ बाजार पेठेत या आठवड्यात देखील सोने दरात मोठी वाढ झालेली दिसून आलीय. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने तब्बल ७९० रुपयांनी महागले होते. त्यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर ५१, ५७० इतका आहे. तर दुसरीकडे चांदीच्या (Silver) दरात देखील ५८० रुपयाची वाढ दिसून आली. यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर ६५,३६० इतका आहे.

दरम्यान, मागील एका वर्षातील सोन्याची ही उच्चांकी पातळी आहे. गेल्या वर्षी सोने ४७,२१० प्रति तोळा इतका होता. म्हणजे गेल्या एका वर्षात ४३०० ते ४४०० रुपयांनी सोने वधारलेले दिसून येतेय. दरम्यान, आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.

जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने १७० रुपयांनी महागले होते. तर चांदी २९० रुपयांनी स्वस्त झाली होती. सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५०,२७० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,०९०, बुधवारी ५०,५४०, गुरुवारी ५०,७८० आणि शुक्रवारी ५१,५७० रुपये इतका होता. गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात तब्बल १४७० रुपयाची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६४,४६० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,७४०, बुधवारी ६४,४७०, गुरुवारी ६४,७८० आणि शुक्रवारी ६५,३६० रुपये इतका होता. गेल्या पाच दिवसात चांदीच्या दरात जवळपास ११०० ते १२०० रुपयाची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या सोन्याच्या भावात तब्बल १०६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे.

गुंतवणुकदारांचा मोर्चा ‘सोन्या’कडे?
शेअर बाजाराला मोठ्या पडछडीला सामोरे जावं लागलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरता, आजवरच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचेही पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :