⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

TVS ची लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच ; किंमत अन् फीचर्सबद्दल जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । तुम्हीही स्पोर्ट्स बाईकचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. नुकतीच TVS मोटरने भारतात लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Apache RTR 160 चे नवीन ब्लेझ ब्लॅक डार्क एडिशन लॉन्च केला आहे. 160cc सेगमेंटमध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व बाइक्सपैकी नवीन RTR 4V 160 बाईकमध्ये सर्वाधिक पॉवर आहे, असा कंपनीचा दावा आहे.

कंपनीने नवीन RTR 160 4V ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये ठेवली आहे. तसेच RTR 160 ब्लॅक एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

नवीन Apache RTR 4V 160 ब्लॅक डार्क एडिशनच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात तेच इंजिन आहे जे याच्या सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 159.7 cc इंजिन आहे, जे 17.6PS पॉवर आणि 14.73Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकमध्ये एक डिजिटल स्पीडोमीटर आहे. यामध्ये तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लो फ्युएल वॉर्निंग, लीन अँगल मोड, क्रॅश अलर्ट आणि कॉल/एसएमएस यासारखे फीचर्स मिळतील.

फीचर्स
ब्लॅक पेंट स्कीम आणि लोगो व्यतिरिक्त, TVS Apache RTR 160 4V ब्लॅक एडिशनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल दिसत नाहीत. बाईकचा बॉडी पेंट ग्लॉसी ब्लॅक आहे. ही बाईक ब्लॅक रंगात अतिशय आकर्षक दिसते. बॉडी टँक अधिक बोल्ड दिसते.

चांगल्या ब्रेकिंगसाठी बाईकमध्ये 270mm पेटल डिस्क ब्रेकची सुविधा आहे. यासोबतच ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यांचे दोन्ही टायर 17 इंच आकाराचे आहेत. या बाईकचे एकूण कर्ब वजन 139 किलो आहे. याची टॉप स्पीड 107kmph आहे.