सर्वसामान्यांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा भाव घसरला, नवीन भाव काय?..

नोव्हेंबर 17, 2025 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२५ । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महत्वाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर घसरल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.जर तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल तर आजचे दर वाचा.

gold

काय आहे २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर

२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११० रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर आज ९९,९७६ रुपये आहेत. आज २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर सध्या १,१४,५५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९१,६४० रुपयांवर विकले जात आहे.

दुसरीकडे आज चांदी दरातही घसरण आहे. चांदी दरात २००० रुपयांची घसरण झालीय. यामुळे आता एक किलो चांदीचा दर १,६७,००० रुपयावर आला आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात अंदाजे 4 टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. जागतिक बाजारातील बदल, फेडकडून डिसेंबर महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता आणि डॉलर दर कमी होत असल्याने या आठवड्यातही सोन्याच्या दरांमध्ये चढउतार राहू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now