⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांना दिलासा नाहीच! आज काय आहे सोने-चांदीचा भाव? तपासून घ्या..

ग्राहकांना दिलासा नाहीच! आज काय आहे सोने-चांदीचा भाव? तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | सोन्याच्या वाढत्या किमतीतून काही दिलासा मिळताना दिसत नाहीय. गेल्या दहा बारा दिवसात सोन्याने नवीन उच्चांकी दर गाठला आहे. सोबतच चांदीने देखील मोठा पल्ला गाठला आहे. यामुळे ऐन लग्नसराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली आहे. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती

सोन्याचा दर काय?
मार्च महिन्यात, सुरुवातीला दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वधारले. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 1800 रुपयांची भरारी
या महिन्यात सुरुवतीला दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी वधारली. या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. तर 14 मार्च रोजी 1800 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.