जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । जागतिक बाजारातील नकारात्मकतेचे पडसाद भारतीय सराफ बाजारात दिसून आले. जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने चांदीच्या भावात तेजी दिसून आली. सलग पाच दिवसाच्या भाववाढीने सोने ५० हजारांवर जाऊन पोहचले आहे. जळगाव सराफ बाजारात सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०,१०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६४,७५० रुपये प्रति किलो इतका आहे.
जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत कालच्या झालेल्या दरवाढी नंतर सोन्याच्या दराने पुन्हा पन्नाशी ओलांडली आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने ३०० रुपयांनी महागले होते. तर चांदी ५९० रुपयांनी महागले होते. या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल १०६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून आली.
दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.
या आठवड्यातील दर
सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा
११ फेब्रुवारी (शुक्रवा) ५०,१०० रुपये प्रति तोळा
चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो
११ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६४,७५० प्रति किलो
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा
हे देखील वाचा :
- लक्ष द्या ! १ जून पासून बदलणाऱ्या या ५ नियमांचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
- लग्न जुळवण्याच्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- एरंडोल नगरपालिकेचे आफ्रिकेत सादरीकरण
- राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा
- जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज