⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोने-चांदीत सर्वात मोठी घसरण ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या भावात ७७० रुपयाची तर चांदीच्या भावात तब्ब्ल २४१० रुपयाची घसरण झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होत असल्याने, त्यांचे भाव कमी होत आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात ९९० रुपयाची तर चांदीच्या भावात २०५० रुपयाची घसरण झाली होती.

जानेवारी महिन्याच्या सुरवातीला ५२ हजार रुपये तर महिन्याभराच्या सुवर्ण बाजार चढउतारीमूळे पन्नास हजारा रुपये भाव उतरले होते. तर फेब्रुवारीत ५० हजार ते ४८ हजार रुपये प्रति तोळे सोन्याचा दर होता. तर मार्च महिन्यात ४८ हजारापासून सोन्याच्या भाव कमी होण्यास सुरवात झाली. एप्रिल महिन्यात तर सोन्याच्या दर ४६ हजाराच्या घरात आला होता. तो मे च्या सुरवीला ४८ हजाराच्या घरात गेला. मे महिन्यात सोने पुन्हा ४८ ते ५० हजाराच्या घरात गेले. तर जूनमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. ५० हजार रुपयापर्यंत भाव ४८ हजार रुपयापर्यंत आला. मात्र जुलैमध्ये पुन्हा सोने वाढू लागल्याने सोने ४८ हजार ते ४९ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत गेले.

या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति दहा ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास २५०० हजार रुपयापर्यंत  सरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७७३ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,७३० रुपये असून त्यात आज ९९० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६६,५२० रुपये इतका आहे.