सोन्या-चांदीचे दर पुन्हा भडकले; जळगावात आताचे दर काय?

एप्रिल 10, 2026 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२६ । आखाती देशांमधील युद्धामुळे सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र आता युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसून येत आहे. या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही होताना दिसत आहे.

gold silver 1 jpg webp

काल गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोन्यासह चांदी दरात घसरण झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी आज शुक्रवारी सराफा बाजार उघडताच जळगाव बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.

काय आहे भाव?

जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १ हजार रुपयांची वाढ होऊन दर १,५५,०१५ रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दरही प्रति किलो ५ हजार रुपयांनी वाढून २,५२,३५० रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत असून, खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर राहिली नाही तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now