संदीप गावित यांनी स्वीकारली जळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार

एप्रिल 12, 2026 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. नुकताच राज्य शासनाच्या बदली आणि पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

sandip gavit 2

जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नखाते यांच्या बदलीची स्वतंत्र ऑर्डर निघणार असल्याने त्यांची नियुक्ती अद्याप कुठे करण्यात आले हे कळू शकले नाही.

यावेळी अशोक नखाते यांनी नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर संदीप गावित यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि नागरिकांशी समन्वय वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान,संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे शिवाय त्यांना जिल्ह्याची माहिती आहे शिवाय भुसावळ विभागाची धूराही 31 जुलै 2025 रोजी सांभाळली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभावी काम केल्याने जिल्हावासीयांना गावीत यांच्या कार्याची पद्धत ठावूक आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला निश्चितपणे होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now