सोने - चांदीचा भाव

अरे देवा ! युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोने-चांदी दरात मोठी उसळी, ग्राहकांची चिंता वाढली

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२६ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी चढ-उतार सुरु आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आता इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसून आली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर झाला असून आज बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. Gold Silver Rate today

या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर दिसून आला असून सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली, तर चांदीच्या दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या जळगाव बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर सुमारे 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 54 हजार 410 रुपयांपर्यंत गेला आहे.

सोन्या आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button