सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण ; जळगावमध्ये नवीन दर काय?

ऑक्टोबर 28, 2025 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी तोंडावर विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोने आणि चांदी दरात आता मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना दोन्ही धातू अचानक स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे तर व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

gold silver 1 jpg webp

जळगाव सराफ बाजारात आज दि २८ ऑक्टोबर रोजी सकाळी बाजार उघडताच सोने दरात २८८४ रूपयांची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २३ हजार २९१ रूपयांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे चांदी दरात ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत घसरले.

दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. जळगाव शहरात १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह १,३५,४४५ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मागच्या १० दिवसात सोने दरात १२ हजार रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.

तसेच जळगाव शहरात १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ९२ हजार ६१० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. उच्चांकीपासून चांदीचा दर आतापर्यंत ४० हजाराहून अधिकची घसरण झाली. दिवाळीनंतर आता लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. त्यापूर्वीच सोने आणि चांदी अचानक स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी दिवसात सोने चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now